जन्माला येणारे आपत्य कसे असावे यावर कुणाचेही नियंत्रण नसते मात्र दिव्यांग मुलगा झाला म्हणून एक व्यक्ती पत्नीला सोडून निघून गेला त्यामुळे तणावाखाली गेलेल्या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , निषाद खलील सय्यद ( वय वीस वर्ष ) असे मयत महिलेचे नाव असून खलील रशीद सय्यद , सासरा रशीद हसूद्दीन सय्यद , इलाही रशीद सय्यद , ननंद आसिफा शकील सय्यद , सय्यद शकील आणि शाकीर रशीद या सर्वांच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथील रहिवासी असलेला बावीस वर्षांचा खलील याच्यासोबत निषाद हिचे लग्न दोन जुलै 2021 रोजी झालेले होते. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या व्यक्तींनी तिच्या माहेरच्या व्यक्तींकडे फ्लॅट घेण्यासाठी पैशाचा तगादा सुरू केला . माहेराहून नकार दिल्यानंतर निषाद हिला मारहाण करण्यात यायची . शेंद्रा एमआयडीसीमध्ये तिला नोकरी लागली म्हणून निषाद आणि तिचा पती छत्रपती संभाजीनगर येथे राहण्यासाठी आली . सासरची मंडळी तिथे देखील येऊन तिला त्रास देत असायची.
2022 मध्ये निषाद हिला मुलगा झाला मात्र मुलगा दिव्यांग असल्याकारणाने हताश झालेला खलील हा पत्नीला सोडून निघून गेला त्यानंतर निषाद ही एकटीच या मुलाचे संगोपन करत होती. जावयाने मुलीला चांगले वागवावे यासाठी वडिलांनी अखेर आर्थिक मदत देखील केली मात्र पैसे घेऊन देखील खालील हा बायकोकडे राहण्याऐवजी सतत गावी जात असायचा. अखेर हतबल झालेली निषाद हिने 15 डिसेंबर रोजी स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केली त्या ठिकाणी तिने उर्दू भाषेमध्ये सय्यद खलील , सय्यद रशीद पुढे एक मोबाईल नंबर आणि ए आर एच निगेटिव्ह असे लिहून एसबीआयचा एक कॅन्सल चेक देखील ठेवलेला आहे. सदर प्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत .