महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या चर्चेत आलेले असून एक वर्षांपासून पत्नीचे इतरत्र प्रेमसंबंध सुरू आहेत याची प्रचिती आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी परिसरातील शेलगाव येथील एका तरुणाने गळफास घेतला आहे . मयत व्यक्तीच्या पत्नीसोबत तिच्या प्रियकराच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , प्रियंका मुकेश गवळी आणि तिचा प्रियकर चेतन मुकेश कोयरे ( दोघेही राहणार शेलगाव ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून प्रियंकाचा पती मुकेश गवळी याने चेतन सोबत दोघांची काही छायाचित्रे इंस्टाग्रामच्या स्टेटस वर पाहिलेली होती . 17 ऑक्टोबर रोजी हतबल झालेल्या पतीने अखेर आत्महत्या केली त्यानंतर मुकेशच्या वडिलांनी त्याची सून आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली होती.
मुकेश हा कामानिमित्त बुलढाणा येथे राहायला होता त्यावेळी त्याची पत्नी प्रियंका हिचे शेलगाव येथील चेतन कोयरे याच्या सोबत अनैतिक संबंध जुळले. सदर बाब मुकेशला समजल्यानंतर मुकेश गावाकडे आला आणि त्यानंतर त्यांचे एकमेकांसोबत खटके उडू लागले. आत्महत्या होण्याआधी दोन महिने प्रियंका ही माहेरी निघून गेलेली होती याच दरम्यान तिने प्रियकरासोबतचे स्टेटस मोबाईलवर ठेवलेले होते ते पाहून मुकेश नाराज झाला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. अंजनगाव सुर्जी पोलिस सध्या तपास करत आहे .