‘ सततची भाईगिरी ‘ अंगलट , दुचाकीवर बसवून नेलं अन 

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथे समोर आलेले असून गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि दारूचे व्यसन यातून सतत पैशासाठी मागणी आणि शिवीगाळ करत असल्याकारणाने नऊ जणांनी संगणमत करून एका तरुणाचा खून केल्याचे प्रकरण दिंडोरीत समोर आलेले आहे. दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील ही घटना आहे. सर्व आरोपींनी मिळून खून केल्यानंतर मृतदेह पुरून टाकलेला होता. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली असून एक विधी संघर्ष बालक आणि एकजण फरार आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , वांजुळे येथील तरुण हरिश्चंद्र कचरू शेवरे उर्फ हऱ्या ( वय 36 वर्ष ) हा 14 डिसेंबर रोजी गायब झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात नोंदवलेली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यानंतर काही जणांना ताब्यात घेण्यात आलेले होते त्यावेळी आरोपींनी खुनाची कबुली दिलेली आहे. 

हरिश्चंद्र शेवरे हा जबरदस्तीने पैशाची मागणी करायचा आणि पैसे दिले नाहीत तर त्रास द्यायचा त्यामुळे त्याचा त्रास असेही होत असल्याने छगन गांगोडे नावाच्या व्यक्तीने हरिश्चंद्र शेवडे याला दुचाकी वर बसून टिटवे गावाच्या पुलाजवळ आणले आणि तिथे दबा धरून बसलेल्या इतर संशयितांनी त्याला लाठ्या काठ्या आणि हत्यारांनी मारहाण करून त्याचा खून केला. 

हरिश्चंद्र याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी नेऊन पुरण्यात आलेला होता . पोलिसांनी या प्रकरणात सात जणांना ताब्यात घेतलेले असून दोन जण अद्याप पर्यंत फरार आहेत . घटनेमध्ये एकूण नऊ आरोपी असून मयत हरिश्चंद्र हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समोर आलेले आहे . उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 


Spread the love