पुण्यात कोरियन तरुणीसोबत गैरवर्तन , आरोपी अखेर पोलिसांनी धरला 

Spread the love

पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारा एक प्रकार काही दिवसांपूर्वी पुण्यात समोर आलेला होता . देश-विदेशातील अनेक पर्यटक पुण्यामध्ये भेट देतात मात्र पुण्यात आल्यानंतर व्हिडिओ बनवत असताना साउथ कोरियाच्या एका तरुणीच्या सोबत एक घृणास्पद प्रकार घडलेला होता एक अज्ञात तरुण तिथे आला आणि त्याने तिच्या गळ्यात हात टाकला आणि त्यानंतर तिथून तो पळून गेला . सदर प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अखेर या तरुणाला अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , कैली असे साउथ कोरियाच्या या तरुणीचे नाव असून तिच्या यूट्यूब चैनलवर तिने एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये आपण भारतात पर्यटनासाठी आलेलो आहोत असे कॅप्शन देत तिने सोलो ट्रॅव्हल स्वतःला म्हणत हा व्हिडिओ बनवला . व्हिडिओच्या सुरुवातीलाच ती तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला वाईट माणसांचे अनुभव देखील येतात मात्र काही लोकांच्या वर्तनावरून भारतीयांबद्दल मत तयार करू नका , असे देखील तिने म्हटलेले होते. 

आरोपी तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला .. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका दुकानाजवळ आल्यानंतर ती लोकांची विचारपूस करत असताना एक तरुण अचानकपणे समोर आला आणि फोटो काढण्याच्या पाहण्याने तिच्या खांद्यावर त्यांनी हात टाकला त्यानंतर तिच्या गळ्यात देखील हात टाकला आणि व्हिडिओमध्ये तरुण मराठी बोलत असल्याचे दिसून आले. 

सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अखेर या तरुणाचा शोध घेतला आणि त्यानंतर त्याला अटक केली . धक्कादायक बाब म्हणजे व्हिडिओमध्ये ही तरुणी मला इथून लवकर जायला पाहिजे असे म्हणत तिथून निघून गेली त्यानंतर त्याने जवळ जवळ मला मिठीच मारली होती पण मला याचे कारण देखील समजले नाही असे तिने म्हटलेले होते. देशाची प्रतिमा खराब करण्याचे काम या तरुणाने केलेले असल्याकारणाने पोलिसांनी देखील त्याला पकडण्यासाठी कंबर कसलेली होती आणि अखेर त्याला अटक करण्यात आली 


Spread the love