महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार नवी मुंबईत समोर आलेला असून कमी किमतीत तुम्हाला अमेरिकन डॉलर देतो असे सांगत दोन जणांनी कांदिवली येथील एका व्यापाऱ्याची दोन लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे . विशेष म्हणजे आरोपींनी त्यांना नोटाच्या आकाराचे कागदी बंडल दिले आणि तिथून पलायन केले. रबाळे पोलिसात दोन भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गुरफान आलम आली सिद्दिकी ( वय 41 ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून कांदिवली परिसरात ते राहायला आहेत. स्विगीचे डिलिव्हरी बॉय म्हणून ते काम करत असून काही महिन्यांपूर्वी कांदिवली भागात नारळ विक्री करणाऱ्या एका व्यक्तीसोबत त्यांची ओळख झाली होती. नारळ विक्री करणाऱ्या व्यक्तीचा भाऊ असल्याचे भासवत अन्वर नावाच्या एका व्यक्तीने गुरफान यांच्याशी संपर्क साधला आणि 20 डॉलरच्या आपल्याकडे 1750 नोटा आहेत असे सांगितले
सदर नोटा घनसोली येथील डी मार्ट जवळ तुम्हाला देऊ त्या बदल्यात तुम्ही भारतीय रुपयात पैसे द्या असे गुरफान यांना सांगण्यात आलेले होते. कमी किमतीत अमेरिकन डॉलर मिळत असल्याकारणाने त्यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने दोन लाख रुपयात गहाण ठेवले आणि रविवारी सकाळी पत्नीसोबत घनसोली इथे गेले.
आरोपींनी त्यानंतर गुरफान यांच्या जवळचे दोन लाख रुपये आपल्याकडे ठेवले आणि अमेरिकन डॉलर सांगत पांढऱ्या रंगाची पिशवी गुरफान यांच्या बॅगेत कोंबली आणि त्यानंतर तिथून ते निघून गेले . गुरफान यांनी पिशवीतील अमेरिकन डॉलर तपासले त्यावेळी डॉलर ऐवजी नोटांच्या आकाराचे कागदी बंडल होते त्यावर कुठलीही छपाई केलेली नव्हती. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच गुरफान यांनी पोलिसात गाव घेतलेली आहे .