देशात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून सकाळी चहा बनवण्यास उशीर झाल्याने एका नराधम पतीने धारदार तलवारीने सपासप वार करत पत्नीचा खून केलेला आहे. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील फजलगड गावात मंगळवारी सकाळी ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुंदरी ( वय 50 ) असे मयत महिलेचे नाव असून तिच्या मुलाने यासंदर्भात पोलिसात दाखल करत महिलेचा पती याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे . महिलेचा पती धर्मवीर याला अटक करण्यात आलेली असून पत्नीने वेळेवर चहा बनवून दिला नाही म्हणून धर्मवीर हा संतापला आणि त्याने घरातील तलवारीने पत्नीवर वार केले.
मुलाने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे आईला वाचवण्यासाठी मी माझ्या बहिणींनी प्रयत्न केला मात्र वडिलांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आणि सर्वांना दमदाटी करत घराबाहेर काढून दिले . आईचा मृत्यू झाल्यानंतर देखील आरोपी वडील हे तिच्यावर सतत वार करत होते. आरोपीने त्यानंतर तलवार हवेत फिरवत दहशत निर्माण केली अशी देखील माहिती मुलाने दिलेली आहे.