मटणाचे 61 लाख देण्यास नकार , पुण्यातील दोघांवर गुन्हा दाखल

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका मटन विक्रेत्याची तब्बल 61 लाख रुपयांची उधारी थकली म्हणून दोन जणांच्या विरोधात लष्कर पोलिसात फिर्याद दाखल केलेली आहे . आरोपी मटणाची उधारी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संबंधित मटन विक्रेत्याने लष्कर पोलिसात याप्रकरणी तक्रार दिलेली असून अफजल युसुफ बागवान आणि अहतेशाम आयाज बागवान अशी आरोपी व्यक्तींची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी मटन विक्रेत्याची मटणाची तब्बल 61 लाख रुपयांची उधारी देण्यास टाळाटाळ केलेली असल्याचे फिर्यादी यांनी म्हटलेले असून दोन्ही आरोपी यांचा पुण्यामध्ये हॉटेल व्यवसाय आहे. 

हॉटेलमधील व्यवसायासाठी त्यांना रोज मटन खिमा , गुरदा असे मटेरियल फिर्यादी यांनी त्यांना पुरवलेले होते. 2019 पासून 2023 पर्यंत तब्बल चार वर्ष त्यांनी दोन कोटी 91 लाख 81 हजार रुपयांचे मटन खरेदी केले मात्र मटणाचा हिशोब केल्यानंतर त्यांच्याकडे हॉटेल व्यवसायिक यांच्याकडे 61 लाख रुपयांची बाकी असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. 

उर्वरित रक्कम आरोपींनी परत केलेली आहे मात्र 61 लाख रुपये राहिले म्हणून हॉटेल व्यावसायिक आता पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. हतबल झालेले मटन व्यावसायिक यांनी त्यानंतर दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केलेली आहे. 


Spread the love