महाराष्ट्रात फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार छत्रपती संभाजी नगर येथे समोर आलेला असून शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक असलेले महेंद्र मदनलाल काला यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सख्ख्या भावाने त्यांच्या सह्यांची लेटरहेड चोरत कोट्यावधीची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
महेंद्र यांच्या पत्नी अरुणा यांनी याप्रकरणी पोलिसाकडे तक्रार केलेली होती. आपल्या पतीची एक कंपनी होती आणि तिच्या माध्यमातून ते शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटाचा व्यवसाय करत असत तर त्यांचे भाऊ त्यांना व्यवसायात मदत करायचे . एक नोव्हेंबर 2019 रोजी महेंद्र यांचे आजाराने निधन झाल्यानंतर आपण विश्वासाने सर्व कागदपत्रे आणि चाव्या त्यांच्या भावाकडे सुपूर्द केलेल्या होत्या. तीन विवाहित मुलींच्या नावाने वारस प्रमाणपत्र हवे म्हणून आपण त्यांच्याकडे मागणी केली मात्र त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरू केलेले होते असे पत्नी यांनी म्हटलेले आहे.
सदर प्रकरणात आत्तापर्यंत नरेंद्र मदनलाल काला , विजय मदनलाल काला आणि आदित्य विजय काला यांच्यासोबत सात जणांच्या विरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण हैदराबादला शस्त्रक्रियेसाठी गेलेलो होतो त्यावेळी आपल्या घरात चोरी झालेली असून दागिन्यांसोबत महत्त्वाची कागदपत्रे आणि महेंद्र यांच्या सहीचे लेटरहेड चोरीला गेलेले आहे.