महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार धाराशिव इथे समोर आलेला असून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या एका लॉजवर छापा टाकत चार महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका दलालासोबत लॉज चालक आणि लॉजचा मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना धाराशिव शहरात नॅशनल हायवेजवळ निसर्ग गारवा लॉज येथे काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि ग्राहकाने इशारा करताच कारवाई करण्यात आली.
हॉटेल चालक दिलीप रामदास अडसुळे ( वय 63 राहणार धाराशिव ), दलाल बालाजी चंद्रकांत गवळी ( वय 29 राहणार धाराशिव ) आणि लॉजचा मालक नितीन रोहिदास हे सर्व आरोपी संगनमताने हा प्रकार करत असल्याचे तपासात समोर आलेले आहे . पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी तिथून मोबाईल फोन , नोंदीचे रजिस्टर , एक ऑटो रिक्षा आणि काही रोख रक्कम सोबतच कंडोमची पाकिटे आणि मलम आढळून आलेली आहेत . विविध कलमअंतर्गत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे