‘ तुझा आवाज शेवटचा एकदा ऐकायचा आहे ‘ , पती फोनवर म्हणाला अन. 

Spread the love

महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर डोंबिवलीत समोर आलेली असून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला फोन करून ‘ तुझा आवाज शेवटचा एकदा ऐकायचा आहे ‘ अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर फोन ठेवला आणि व्हाट्सअप वर मेसेज केला. तो मेसेज पाहिल्यानंतर महिलेचे आयुष्य उध्वस्त झालेले आहे. पतीने स्वतःचे आयुष्य संपत गळफास लावण्याचा फोटो पत्नीला पाठवला आणि गळफास  घेतला . 

उपलब्ध माहितीनुसार , सुधाकर यादव ( वय 41 ) असे मयत व्यक्ती याचे नाव असून सुधाकर आणि त्यांची पत्नी संजना यादव ( वय 31 ) यांच्यात 19 डिसेंबर रोजी भांडण झालेले होते. संजना अखेर दिवा येथील त्यांच्या बहिणीकडे राहायला निघून गेल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास संजय यांनी त्यांना फोन केला आणि मला दोन मिनिट तुझा आवाज ऐकायचा आहे असे सांगितले. 

पतीचा फोन आल्यानंतर संजना यांनी त्यांच्यासोबत संभाषण केले. फोन आला त्यावेळी संजना या कुर्ला येथील त्यांच्या ऑफिसच्या दिशेने जात होत्या त्यांनी पतीचा फोन उचलला आणि दोन मिनिट त्यांच्याशी संभाषण देखील केले मात्र त्यानंतर फोन ठेवल्यावर व्हाट्सअप वर एक मेसेज आला त्यामध्ये सुधाकर यांनी गळफास लावण्याचा फोटो त्यांना पाठवला होता. 

त्यांनी पुन्हा सुधाकर यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र सुधाकर यांनी फोन उचलला नाही अखेर शेजारच्या व्यक्तींना त्यांनी फोन करून या प्रकाराची कल्पना दिली म्हणून शेजारी सुधाकर यांच्या घराकडे पोहोचले मात्र दरवाजा आतून बंद होता . शेजाऱ्यांना पोहोचण्यास उशीर झाला आणि सुधाकर यांनी गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवलेले होते. विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला असून अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आलेली आहे. 


Spread the love