देशात एक धक्कादायक असे प्रकरण छत्तीसगडातील रायपूर येथे समोर आलेले असून पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे आणि तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी एका व्यावसायिकाला नऊ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. जलदगती न्यायालयाने या व्यावसायिकाच्या आई-वडिलांना देखील दहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी व्यावसायिकाने त्याच्या पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बनवण्यासाठी दबाव टाकल्याचे छत्तीसगडमधील दुर्ग जलदगती न्यायालयाने आदेशात म्हटले होते सोबतच गुन्ह्याचे स्वरूप पाहता आरोपीला कुठलाही दिलासा देणे योग्य राहणार नाही असेही म्हटले होते. आरोपीच्या विरोधात कलम 377 आणि कलम 323 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याचे लक्षात आले सिद्ध झाल्याचे समोर आल्यानंतर त्याला नऊ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
2007 मध्ये आरोपी व्यवसायिकाचे लग्न झालेले होते त्यानंतर त्याने महिलेला शारीरिक तसेच मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. हुंड्यासाठी महिलेचा छळ केला जायचा आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पतीकडून जबरदस्ती केली जायची. फिर्यादी महिलेने त्याला नकार दिला आणि अखेर 2016 मध्ये फिर्यादी महिला घर सोडून माहेरी राहायला गेलेली होती त्यानंतर तिने पती आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता त्यावर न्यायालयाने नऊ वर्ष कैदेची शिक्षा या व्यावसायिकाला सुनावलेली आहे .