देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना झारखंड इथे उघडकीस आली असून दोन्ही बहीणींनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे मात्र ही आत्महत्या आहे की हत्या ? याचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस तपास सुरु आहे . धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही बहिणींनी चक्क मध्यरात्री वाढदिवस साजरा केला अन दुसऱ्या दिवशी दोघीही मृत अवस्थेत आढळून आल्या. मोठया बहिणीचे नाव शीतल लखानी असे असून लहान बहिणीचे नाव मान्या असून मान्या ही इयत्ता नववीमध्ये शिकत होती.
उपलब्ध माहितीनुसार , मोठी बहीण शीतल लखानी रांचीच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करत असून त्याचे वडील हे रांचीत एक मोठे ठेकेदार आहेत. बुधवारी रात्री मोठी बहीण शीतल हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर दोन्ही बहिणी त्यांच्या खोली झोपायला गेल्या त्या सकाळी थेट मृत अवस्थेतच आढळून आल्या. मोठी मुलगी शीतल लखानी हिचे लग्न पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार होते मात्र त्याच्या आतच ही दुर्दैवी घटना घडली. दोघींचेही मृतदेह हे पोस्ट मार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.
घटनेत आणखी एक बाब समोर आली असून अवघ्या एक दिवसापूर्वी त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला होता त्यामुळे त्या काहीशा नैराश्यात होत्या मात्र इतक्या कारणावरून त्या आत्महत्या करू शकतील असे वाटत नसल्याचे परिवाराचे म्हणणे आहे .पहाटे 5.40 च्या सुमारास तिच्या आईने खोली उघडली असता दोन्ही बहिणींना उलट्या झाल्या होत्या व त्या बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या . रुग्णालयात नेले असताना त्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
रांची ग्रामीण एसपी नौशाद आलम यांनी सांगितले की, ज्या खोलीत दोन्ही बहिणींचे मृतदेह सापडले होते ती एफएसएल तपासणीनंतर सील करण्यात आली आहे. याशिवाय मोठ्या बहिणीचे लग्न ठरले असून तिच्या वाढदिवसाला तिचा होणारा नवराही आला होता. मात्र वाढदिवस साजरा करून तो त्याच्या घरी परतला असल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे.