‘ तू ओरिजनल तृतीयपंथी नाही तू नकली आहेस .. हा आमचा इलाका आहे इथे तू येऊ नकोस ‘ असे म्हणत भंडारा जिल्ह्यातील सिहोरा इथे एका तृतीयपंथीय व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची नग्न अवस्थेत धिंड काढण्याचा प्रकार समोर आलेला आहे . पीडित व्यक्तीचे वय 38 वर्षे असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस दलात देखील खळबळ उडाली आणि त्यानंतर आठ ते दहा जणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात पोहोचले आहे. मारहाण करणारे तृतीयपंथीय आरोपी हे बालाघाटचे असल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथे शनिवारी तृतीयपंथीय व्यक्तींचा एक गट बाजारामध्ये होता त्यावेळी त्यांना एक तृतीयपंथी व्यक्ती दुकानात पैसे मागत असल्याचे लक्षात आले त्यानंतर सर्व आरोपींनी तिथे जात त्याला मारहाण केली आणि विवस्रावस्थेत त्याची धिंड काढली आणि त्याला तिथेच सोडून दिले. पोलिसांनी पीडित तृतीयपंथीय व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणले आणि त्यानंतर मारहाण करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवला.