पुणे हादरलं..चुलती पाठोपाठ काही तासात अविवाहित पुतण्याचे देखील टोकाचं पाऊल

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक आणि दुर्दैवी अशी घटना शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील संगमेश्वर वस्ती इथे समोर आलेली असून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर महिलेच्या पुतण्याने दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे . दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. 

उपलब्ध माहितीनुसार , चार तारखेला दुपारी बाराच्या सुमारास गणेगाव दुमाला येथील संगमेश्वर वस्तीवरील कल्पना रवींद्र शिंदे ( वय ३४ ) यांनी राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती . त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला त्यानंतर सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे ( वय 24 ) याने देखील घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

सचिन हा अविवाहित असून कुरकुंभ येथील सिपला कंपनीत कामाला होता . कल्पना यांच्या पाठीमागे पती मुलगा आणि मुलगी असा परिवार असून दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही  . पोलीस निरीक्षक ज्योतिराव गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. 


Spread the love