महाराष्ट्राचा बिहार ? , पुण्यातून कराड ऐवजी मिरजेला गेली अन त्यानंतर..

Spread the love

महाराष्ट्राचा बिहार झाला असल्याच्या घटना रोज समोर येत असून अशीच आणखीन एक घटना पुन्हा एकदा समोर आलेली आहे . पुण्यातून कराड येथे निघालेली एक विवाहित तरुणी झोपेमध्ये मिरज स्थानकावर आल्यानंतर तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यासोबत तिची कर्नाटकातील जमखंडी येथे विक्री करण्यात आल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. तीन महिला आणि अकरा जणांच्या विरोधात मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पीडित तरुणी ही झोप लागल्यामुळे कराडमध्ये उतरण्याऐवजी मिरज येथे आली . मिरज स्टेशनवर आल्यानंतर तिने एका बिहारी व्यक्तीला पुण्याला जाणाऱ्या रेल्वेबद्दल विचारणा केली त्यावेळी त्या ठिकाणी पाच संशयित आले आणि ‘  तुला कुठे जायचे आहे ‘ असे विचारत तुला पोलीस ठाण्यात घेऊन जातो असे म्हणत तिला घेऊन गेले आणि दुचाकीवरून शेतात घेऊन जात पाच जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

रेल्वे पुलाजवळ आरोपींनी एका कामगाराच्या पत्र्याच्या रूममध्ये पीडितेला कोंडले आणि महिला संतोषी आणि तिचा नवरा सरफराज आणि गंगा मॅडम नावाच्या एका महिलेच्या ताब्यात तिला देण्यात आले त्यानंतर या सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी महिलेला कर्नाटकातील जमखंडी इथे चार लाख रुपयांना विकले आणि त्यानंतर तिच्याबद्दल खोटी माहिती देत तिच्या मनाच्या विरुद्ध एका व्यक्तीसोबत तिचे लग्न देखील लावून दिले . 11 जणांच्या विरोधात मिरजेतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर प्रकरणी सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. 


Spread the love