रावण आणि रामाबद्दल आक्षेपार्ह स्टेट्स , पुण्यात क्लार्क ताब्यात

Spread the love

सोशल मीडियावर व्यक्त होताना काहीतरी सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे मात्र अनेकदा उत्साहाच्या भरात नागरिक हे विसरून जातात आणि त्यानंतर पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाते असाच एक प्रकार पुण्यात समोर आलेला असून पिंपरी इथे भगवान राम आणि रावण यांच्या बद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडलेले आहे. चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , राहुल विठ्ठल वाघमारे ( वय 55 राहणार पिंपरी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाघमारे एका शाळेमध्ये क्लार्क म्हणून काम करतो . धनंजय गावडे ( वय पस्तीस वर्षे राहणार चिंचवड ) या व्यक्तीने आरोपीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिलेली असून मोबाईलच्या स्टेटसवर आरोपी वाघमारे याचे स्टेटस फिर्यादी यास आढळून आलेले होते. 

राहुल वाघमारे याने दोन स्टेटस ठेवलेले होते. एकामध्ये रावण आणि दुसऱ्यामध्ये राम-लक्ष्मण सीता यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर ठेवलेला होता . राहुल याने धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादींनी नमूद केलेले असून चिंचवड पोलिसांनी तात्काळ आरोपी वाघमारे याला अटक केलेली आहे. 


Spread the love