महाराष्ट्र हादरला..६७ वर्षीय वृद्धाचा ७० वर्षीय वृद्धेवर बलात्कार , पीडिता म्हणतेय की ..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी इथे उघडकीस आली असून एका 70 वर्षीय महिलेने 67 वर्षीय वृद्धाने आपल्यावर अत्याचार केल्याची फिर्याद नोंदवली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या धाडी या गावात शनिवारी एक जानेवारीला संध्याकाळी सात वाजता साहेबराव इंगळे या 64 वर्षे वृद्धाने गावानजीक कालव्याजवळ रहिवासी असलेल्या एका 70 वर्ष वृद्धेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा रविवारी स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेला आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, धाडी गावातील लक्ष्मण गवळी यांच्या दुकानातून किराणा घेऊन जात असताना ही वृद्ध स्त्री दिसल्यानंतर आरोपीने अंधारात तिला उचलून नेऊन तिच्यासोबत हे कृत्य केल्याचे महिलेने म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकला मेसरे, पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे हे अधिक तपास करत आहेत.


Spread the love