पुण्यातून जावयाचे अपहरण करून नेलं बीडला , तिथं नेल्यावर..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये नात्याला नाती परकी ठरत आहेत असाच एक प्रकार सध्या समोर आलेला असून एका जावयाने त्याच्या नावावर असलेली जमीन मुलीच्या नावावर करून द्यावी यासाठी सासऱ्याने नातेवाईकांच्या मदतीने चक्क त्याचे अपहरण केलेले आहे. चार चाकी गाडीत बसवत त्याला बीडला नेण्यात आले आणि डांबून ठेवण्यात आले.

जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासोबत त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून विनोद साहेबराव आडे ( वय 25 राहणार रामनगर येरवडा ) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे.

विनोद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरा प्रकाश गेमा राठोड , चुलत सासरा रमेश गेमा राठोड , नातेवाईक मंगेश वडते , दादासाहेब राठोड , अशोक गेमा राठोड ( सर्वजण राहणार शाहू नगर तांडा गेवराई बीड ) अशी आरोपींची नावे आहेत. जावयाच्या नावावर असलेली जमीन आपल्या मुलीच्या नावावर करावी यासाठी या जावयाचे अपहरण करण्यात आलेले होते.


Spread the love