एवढी वर्गणी देऊ शकत नाही म्हणताच कानाखाली , पुणे जिल्ह्यातील घटना

Spread the love

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असल्याकारणाने अनेक ठिकाणी गणपतीच्या वर्गणीसाठी मंडळे सक्रिय झालेले आहेत मात्र मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी वर्गणीवरून एका किराणा दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार लोणी काळभोर परिसरात समोर आलेला आहे. रविवारी दहा तारखेला ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शिवम जयपाल सिंग उर्फ मुन्ना ( वय 27 ), तुषार संजय थोरात ( वय 19 ), निखिल दिलीप कांबळे ( वय 19 ) आणि एक जण अनोळखी अशा चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दिनेश भिकाराम गोरा ( वय 20 राहणार कदमवाक वस्ती तालुका हवेली ) यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे.

दिनेश यांचे लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी किराणा स्टोअर्स नावाने दुकान असून तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक मंडळाच्या काही तरुणांनी दिनेश यांच्या दुकानात तीन हजार रुपये वर्गणीची पावती दिली होती त्यानंतर संध्याकाळी साडेआठच्या सुमारास दहा ते पंधरा तरुणांचा गट वर्गणी मागण्यासाठी दुकानात घुसला . एवढी वर्गणी देऊ शकत नाही असे सांगितल्यानंतर आरोपींपैकी एकाने त्यांना कानाखाली मारली त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचले आहे .


Spread the love