कमी जेवण कर जर जाड झाली तर सोडून देईल , विवाहिता पोलिसात

Spread the love

महाराष्ट्रात किरकोळ कारणावरून कौटुंबिक भांडणाचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून अशीच एक घटना सोलापुर इथे समोर आलेली आहे. ‘ तू जास्त जेवण करू नको जाड झाली तर तुला सोडून देईल ‘ अशी धमकी देत माहेरून दहा लाख आणण्यासाठी एका विवाहित महिलेचा छळ करण्यात आलेला आहे. पती सासू-सासरे अशा तीन जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , स्वाती नवनीत सुलेगाव ( वय 24 राहणार साईबाबा चौक पिंडीगोन हॉस्पिटल जवळ ) असे फिर्यादी महिलेचे नाव असून नवनीत सुलेगाव पती , अंबिका सुलेगाव सासू , कृष्ण हरी सुलेगाव सासरे ( सर्वजण राहणार नवनाथ नगर एमआयडीसी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

फिर्यादी महिला सासरी नांदत असताना आरोपींनी किरकोळ कारणावरून त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली वारंवार फिर्यादी यांना टोचून बोलणे सासरी पाठवण्याची धमकी देणे त्यानंतर तुझ्या आई बापाने लग्नात जावयाला सोने घातले नाही असे सांगत जास्त जाड झाली तर तुला माहेरी पाठवून देऊ असे म्हणत तिचा छळ करण्यात आला.

महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आरोपींनी त्यांना लग्नात आम्ही खूप खर्च केला होता. तुला इथे राहायचे असेल तर तुझ्या आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये नाहीतर इथून निघून जा , असे म्हणत त्यांना हाताने मारहाण करण्यात आली असे देखील त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.


Spread the love