स्वतःच्या इच्छेने कोंबडा बनला , असे सांगणारा ‘ तो ‘ अधिकारी निलंबित

Spread the love

सोशल मीडियावर सध्या उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी उदित पवार यांच्या कार्यालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला आहे. एस डी एम पदावर कार्यरत असलेले उदित पवार यांनी त्यांच्या कार्यालयात तक्रारदार व्यक्तीला चक्क कोंबडा बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पवार यांना तात्काळ निलंबित करण्यात आलेले आहे.

तक्रारदार व्यक्ती यांचे नाव पप्पू लोधी असे असून त्यांनी माध्यमांशी बोलताना , ‘ मी एसडीएम पवार यांच्या कार्यालयात मंदिराशेजारील अतिक्रमण संदर्भात तक्रार देण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्यांनी मला कोंबडा बनायला सांगितले. सदर प्रकरण अखेर जिल्हा दंडाधिकारी शिवकांत द्विवेदी यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी या व्हिडिओची दखल घेत कारवाई केलेली आहे.

जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले त्यानंतर एसडीएम पवार यांनी हा आरोप निराधार असल्याचे सांगत तक्रारदार व्यक्ती हा स्वतःच्या इच्छेने कोंबडा झालेला होता असे सांगितले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेली प्रशासनाच्या मानवताशून्य कारभारावर देखील सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.


Spread the love