ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या शहरप्रमुखाची हत्या , आरोपी स्वतःहून पोलिसात

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण सध्या गडचिरोली इथे समोर आलेले असून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवती सेना शहरप्रमुख असलेल्या महिलेची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे. 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडलेली असून चारित्र्याच्या संशयातून हा प्रकार घडला आणि त्यानंतर संशयित आरोपी पती हा पोलिसात हजर झाला.

उपलब्ध माहितीनुसार , राहत ताहेमीम शेख ( वय 30 ) असे हत्या झालेल्या विवाहित महिले नाव असून राहत ही युवती सेना शहर प्रमुख होती . ती तिच्या 38 वर्षीय पतीसोबत कुरखेडा शहरातील डॉक्टर आंबेडकर वार्ड येथे काही वर्षांपासून राहायला होती. त्यांना दोन अपत्य देखील असून राहत यांचा पती कायम त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा.

पंधरा तारखेला दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्याचा राग विकोपाला गेला आणि त्याने रागाच्या भरात पत्नीचा गळा चिरत तिच्या पोटावर वार केले त्यात राहत यांचा मृत्यू झाला . आरोपी ताहेमीम शेख हा त्याची सासुरवाडी असलेले कुरखेडा येथेच रहायला होता. दुमजली घरात सासू-सासरे खालच्या मजल्यावर तर वरती पती-पत्नी मुले आणि आरोपीचे वडील राहत होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

आपल्या हातून हत्या झाल्यानंतर आरोपी स्वतः कुरखेडा पोलीस स्टेशन येथे गेला आणि तिथे जाऊन त्याने खुनाची कबुली दिलेली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या केल्यावर नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे देखील धुतले आणि तिथून तो पोलीस ठाण्यात पोहोचलेला होता. आरोपीला काही दिवसांपूर्वी हरणाची शिंगे विकणे प्रकरणात देखील अटक करण्यात आलेली होती.


Spread the love