आपण यांना पाहिलंत का ? तरुण दीड महिन्यांपासून बेपत्ता

Spread the love

नगर दौंड रोडवरील नगर शहरातील व्हीआरडीई परिसरात राहणारा एक 34 वर्षीय तरुण एक ऑगस्टपासून 2023 पासून त्याच्या राहत्या घरातून कुणाला काही न सांगता निघून गेलेला असून अद्यापपर्यंत परत आलेला नाही . कुटुंबीयांनी अखेर कोतवाली पोलिसात फिर्याद नोंदवलेली असून गायब झालेल्या या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे. सदर तरुण आढळून आल्यास कुटुंबीयांकडून या 9420053647 ( श्याम पठारे ), 8788260629 , 9405272897 ( प्रमोद पठारे ) यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , वैभव प्रमोद पठारे ( वय 34 वर्ष मोबाईल : 7822963912 ) असे गायब झालेल्या तरुणाचे नाव असून तो काही वर्षांपूर्वी सिकंदराबाद त्रिलंबिरी येथे डीआरडीओ मध्ये नोकरीला होता मात्र नोकरी सोडल्यानंतर घरी आल्यानंतर सातत्याने तणावांमध्ये राहत होता. 2022 मध्ये अचानकपणे तो घरातून निघून गेला त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद देण्यात आली आणि चार महिन्यानंतर तो पुन्हा आढळून आलेला होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याच्यावर उपचार देखील सुरू होते मात्र तो औषधे घेण्यास नकार देत असायचा.

एक ऑगस्ट 2023 रोजी तो सकाळी नऊच्या सुमारास त्याची हिरो होंडा कंपनीची एचएफ डीलक्स मोटरसायकल एम एच १६ डी इ 59 93 ही घेऊन घरातून निघून गेला त्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही . कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. काही काळ कुटुंबीयांनी वाट पाहिली मात्र तो आला नसल्याकारणाने अखेर कोतवाली पोलिसांत यासंदर्भात फिर्याद देण्यात आली. एक ऑगस्ट 2023 पासून तो बेपत्ता असून आढळून आल्यास 9420053647 ( श्याम पठारे ), 8788260629 , 9405272897 ( प्रमोद पठारे ) यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.


Spread the love