मला बायकोचा दर्जा कधी देणार ? , आरोपी सैन्यात उच्च पदावर कार्यरत

Spread the love

देशात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून डान्सबारमध्ये काम करणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात चक्क लेफ्टनंट कर्नल पडला मात्र त्याच्या सोबतची मैत्री या महिलेला चांगलीच महागात पडलेली असून तिचा मृतदेह रविवारी पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे. मयत महिला ही मूळची नेपाळची रहिवासी होती आणि आरोपी हा चक्क लेफ्टनंट कर्नल असल्याचे तपासात समोर आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथील हे प्रकरण असून डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेचे नाव श्रेया असे होते. लेफ्टनंट कर्नल असलेल्या व्यक्तीला ती महिला सिलिगुडी येथे एका डान्सबारमध्ये भेटलेली होती आणि तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झालेले होते. काही दिवसानंतर लेफ्टनंट कर्नलची बदली डेहराडून येथे झाली त्यानंतर त्याने या महिलेला डेहराडून इथे बोलावून घेतले.

मयत आरोपी लेफ्टनंट कर्नल याने त्यानंतर तिच्यासाठी एक घर खरेदी केले आणि त्या घरात ते दोघे राहू लागलेले होते . लेफ्टनंट कर्नलचे नाव रमेंदू उपाध्याय असे असून श्रेया ही त्याला सातत्याने ‘ मला पत्नीचा दर्जा कधी देणार पत्नीचा दर्जा कधी देणार ? ‘ असे म्हणत त्याच्याकडे विचारणा करत होती त्यावरून अखेर लेफ्टनंट कर्नल याने एका क्लबमध्ये तिला दारू पाजली आणि त्यानंतर हातोड्याने वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी लेफ्टनंट कर्नल यास अटक केलेली असून त्याने खुनाची कबुली दिलेली आहे.


Spread the love