तुझ्या ओठावरची लिपस्टिक गेली कुठं ? , बायकोच्या उत्तराने पती चिडला अन

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका पती-पत्नीच्या भांडणाची जोरदार चर्चा सुरू असून आग्रा येथील हे प्रकरण आहे. चक्क लिपस्टिक लावण्यावरून एका दांपत्याचे इतके भांडण झाले की अखेर हे प्रकरण पोलिसात पोहोचले आणि पोलिसांनी समुपदेशन केंद्रात पती-पत्नीला जाण्याचा सल्ला दिला.

उपलब्ध माहितीनुसार , आग्रा येथील या घटनेत शहीदनगर येथील एक तरुण बुटाच्या कारखान्यात काम करतो. तीन महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झालेले असून लग्नानंतर पती-पत्नीमध्ये सर्व काही सुरळीतपणे सुरू होते मात्र अचानकपणे त्यांच्यात भांडण लिपस्टिकवरून सुरू झाले.

काही दिवसांपूर्वी रात्री नाईट ड्युटी संपून पती घरी आला. रात्री झोपण्यापूर्वी पत्नीने लिपस्टिक लावलेली होती मात्र सकाळी तिच्या ओठावरून लिपस्टिक गायब झालेली होती यावरून पतीच्या मनात संशय आला आणि त्यांच्यात भांडण झाल्यावर पत्नी अखेर माहेरी निघून गेली आणि त्यानंतर तिने पती संशय घेतो म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली.

पत्नीने पोलिसांना सांगितले की सकाळी ब्रश केल्यानंतर तोंड धुतले त्यामुळे लिपस्टिक निघून गेली मात्र माझा पती प्रत्येक गोष्टीवरून माझ्यावर संशय घेत असून अनेकदा त्यांनी मला मारहाण देखील केलेली आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात मार्गदर्शन करण्यात आल्यानंतर अखेर प्रकरण निवळले असून पत्नी पुन्हा माहेरी नांदायला गेलेली आहे.


Spread the love