नाशिक हादरले..सोशल मीडियावरची ‘ मैत्री ‘ चक्क लॉजवर पोहचली अन आता ..

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नाशिक येथे समोर आलेली असून एका विवाहित महिलेसोबत ओळख करत परिचय वाढवून तिला पर्यटन आणि देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांवर घेऊन जात भरपूर फोटोसेशन झाल्यावर संशयित व्यक्तीने तिला धमकावले आणि तिच्या पतीला फोटो पाठवण्याची धमकी देत तिच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिलेला मुंबई येथील रहिवासी असलेल्या एका संशयित पुरूषाने मागील वर्षी 18 डिसेंबर ते 28 डिसेंबर या काळात तिच्यासोबत एका सोशल मीडिया ॲपवरून मैत्री केली. त्यानंतर त्याने तिच्याशी अनेक वेळा संवाद साधत तिचा विश्वास संपादन केला आणि सोबत फिरायला जाऊ असे सांगत तो तिला शिर्डी, त्रंबकेश्वर, वनी ह्या ठिकाणी फिरायला घेऊन गेला याच दरम्यान त्याने काही एकत्रित फोटो देखील काढले आणि हे फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले, असे पीडितेचे म्हणणे आहे

भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईत राहणाऱ्या एका संशयिताच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती मात्र पुढील तपास व चौकशी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पीडी पवार या करत आहेत.

Share