ज्यानं पुण्यात कामाला लावलं त्याचीच बायको पळवली,  महिला म्हणते ‘ पुणे नको ‘

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर परिसरात पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर पत्नीच्या विरहात दुःख विसरण्याचा प्रयत्न करत एका व्यक्तीने पुण्यातील एका मित्राच्या पत्नीलाच प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. 

उपलब्ध माहितीनुसार , जामनेर तालुक्यातील एका गावात एका व्यक्तीची पत्नी दोन तीन महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत पळून गेलेली होती. काही दिवस गावाकडे राहिल्यानंतर तो  कामधंदा शोधण्यासाठी पुण्यात पोहोचलेला होता.

पुण्यात मित्राच्या ओळखीने त्याला काम देखील मिळाले मात्र त्यातून त्याचे मित्राच्या घरी जाणे येणे वाढले याच दरम्यान मित्राच्या पत्नी सोबत त्याचे प्रेम जुळले आणि त्यानंतर त्यांनी संधी साधत पुण्यातून पळ काढला. सध्या परिस्थितीत हे प्रेमी युगुल जळगाव जिल्ह्यात असून पुन्हा पुण्यात परतण्यास महिलेने नकार दिलेला आहे. 


Spread the love