पुणे हादरलं..बायकोच्या दुसऱ्या नवऱ्याच्या घरी पोहचला अन..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून आपल्या बायकोने घटस्फोट घेतला आणि दुसरे लग्न केले याचा राग मनात धरत पहिल्या पतीने एका साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार शस्त्राने खून केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुमित उर्फ सोनल पटेकर ( राहणार अग्रवाल प्राइस ) असे मयत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी त्याची पत्नी प्राजक्ता पटेकर ( वय 34 वर्ष राहणार कसबा पेठ ) यांनी फरासखाना पोलिसात फिर्याद दिलेली आहे

सनी राजेंद्र मारटकर ( राहणार खडकी ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो आणि त्याच्या साथीदारावर खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात प्राजक्ता देखील गंभीर जखमी झालेल्या आहेत

दुपारी पावणेतीनच्या सुमारास आरोपी सनी हा महिलेच्या कसबा पेठ येथील घरी आलेला होता. आरोपी सनी हा महिलेचा पहिला पती असून घटस्फोट झाल्यानंतर प्राजक्ता यांनी सुमित याच्यासोबत दुसरा विवाह केला होता तेव्हापासून सनी पहिल्या पत्नीवर खार खाऊन होता. आरोपी घरी आला त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा साथीदार होता आणि दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्याने सुमितच्या डोक्यावर आणि हातावर चाकूने वार केले त्यात सुमित यांचा जागीच मृत्यू झाला. 


Spread the love