पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून जुन्या वादाच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करत एका नामांकित पैलवानाचा तीन तारखेला अत्यंत अमानुषपणे जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे खून करण्यात आलेला आहे . नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार ( वय 36 वर्ष राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर ) असे मयत व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी या खून प्रकरणात अनिल उर्फ मंगल मारुती पवार ( वय बावीस वर्ष ), प्रवीण मारुती पवार ( वय एकोणीस वर्ष राहणार केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे ) या दोन्ही भावांना ताब्यात घेतलेले आहे.
कैलास पवार हे हॉटेलच्या बाहेर येऊन रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ उभे होते त्यावेळी या प्रकरणी मुख्य संशयित सुनील पवार याने चाकूच्या साह्याने त्यांना जखमी केले . सुनील पवार आणि कैलास पवार यांची एक वर्षांपूर्वी एका नातेवाईकांच्या सोहळ्यात शाब्दिक वादावादी झाली होती त्याच कारणावरून तब्बल एक वर्ष पाळत ठेवून आरोपीने हा प्रकार केल्याची परिसरात चर्चा आहे.
संशयित सुनील पवार याने चाकूच्या साह्याने कैलास यांच्यावर वार केले आणि त्यानंतर तो फरार झाल्याचा अंदाज आहे. कैलास यांच्या नातेवाईकांनी त्यांना नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल केलेले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करत असल्याची माहिती आहे.