महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून शाळा सुटल्यानंतर मैत्रिणी सोबत घरी जात असताना एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , प्रीतम उर्फ सोन्या बाळासाहेब डावरे ( वय अठरा वर्ष राहणार उरुळी कांचन तालुका हवेली ) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात एका 14 वर्षीय मुलीने फिर्याद दिलेली आहे.
फिर्यादी मुलगी ही 25 ऑक्टोबर रोजी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती त्यावेळी आरोपी सोन्या हिने तिचा रस्ता अडवला आणि तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने वडिलांना हा प्रकार सांगितला त्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून 26 ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली आहे.