‘ शिक्षणाचा धंदा ‘ बंद करण्यासाठी बारामतीत चौथ्यांदा तरुणाचे उपोषण , आज नववा दिवस

Spread the love

महाराष्ट्रात सध्या खाजगी क्लासेसचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक क्लासेस हे बेकायदेशीरपणे आणि नियम डावलून सर्रासपणे सुरू आहेत . बारामती इथे मोहसीन पठाण नावाच्या तरुणाने तब्बल चौथ्यांदा या क्लासेसवर कारवाईसाठी उपोषण सुरू केलेले असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मोहसीन पठाण असे उपोषण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून 8 ऑक्टोबर 2023 पासून रोजी त्यांनी बारामतीतील बेकायदेशीर क्लासेस बंद होणे साठी आमरण उपोषण सुरू केलेले होते. 13 ऑक्टोबर 2023 रोजी गटशिक्षणाधिकारी , बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, बारामती नगर परिषदेचे अग्निशामक अधिकारी , उपनिरीक्षक वाहन परिवहन अधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्यासोबत मीटिंग घेतली होती. 13 ऑक्टोबर 2023 रोजी मीटिंगमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस ज्यांच्याकडे फायर ऑडिट किंवा फायर एनओसी नाही ते बंद करण्याचे आदेश कार्यकारी दंडाधिकारी साहेबांनी दिलेले होते.

अग्निशामक अधिकारी यांनी देखील १७ ऑक्टोबरपासून कारवाई सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र त्याची कुठलीही पूर्तता करण्यात आली नाही आणि जाणीवपूर्वक 15 दिवस कुठलीही कारवाई केली नाही. बोटावर मोजणे इतके केवळ चार कोचिंग क्लासेस तात्पुरते सील केले आणि पुन्हा दोन दिवसात ते क्लासेस सुरू झाले म्हणून पठाण यांनी 16 नोव्हेंबर 2023 पासून प्रांत अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे.

16 तारखेपासून सुरू केलेले उपोषण आज देखील देखील सुरू असून जिल्हा शिक्षणाधिकारी , पुणे शिक्षण आयुक्त , पुणे महाराष्ट्र जीएसटी कमिशनर , पुणे लेबर कमिशनर या सर्व लोकांनी कोचिंग क्लासेसवर तात्काळ कारवाई करावी असे पत्र द्यावे तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केलेला आहे.

मोहसीन पठाण यांनी नगर चौफेर प्रतिनिधीशी बोलताना , ‘ गटशिक्षणाधिकारी म्हणतात हे माझे कार्यक्षेत्र नाही . जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणतात हे माझे कार्यक्षेत्र नाही. शिक्षण आयुक्त मात्र बघ्याची भूमिका घेतात. माननीय जिल्हाधिकारी यांनी कोचिंग क्लासेस बंद करा म्हणून काही महिन्यापूर्वीच आदेश दिलेले आहेत मात्र 13 ऑक्टोबर 2023 च्या बैठकीमध्ये कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाला देखील बगल दिली जात आहे असा देखील आरोप मोहसीन पठाण यांनी केलेला आहे.


Spread the love