प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण केले , तक्रार दाखल झाली तोपर्यंत.. 

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे हत्याकांडाचे प्रकरण समोर आलेले असून प्रेमप्रकरणातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे . कल्याण ग्रामीण मधील देवा ग्रुप नावाच्या एका संघटनेने हा प्रकार केल्याची चर्चा असून जखमी झालेल्या तरुणावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत . 

मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी बोलताना सांगितले की , त्यांचा मुलगा कबीर जाधव याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत . दोन्ही कुटुंबीयांनी सोबत बसून मुलासोबत मुलीची देखील समजूत काढलेली होती मात्र मुलगी ऐकण्यास तयार नव्हती . सतत ती कबीरच्या संपर्कात असल्याने टिटवाळा परिसरात कबीर त्याचा भाऊ व इतरांसोबत असताना मुलीचा मामा आणि इतर तरुण आले आणि त्यांनी कबीर सोबत इतरांचे अपहरण केले . बाकीच्या चार जणांना सोडून दिले मात्र कबीर याला आरोपींनी बेदम मारहाण केली. 

सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच खडकपाडा परिसरात जखमी झालेल्या कबीरला सोडून दिले आणि त्यानंतर तिथून आरोपींनी पलायन केले . परिसरातील तरुणांनी त्याला रुग्णालयात दाखल केलेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


Spread the love