सनातन धर्माचा प्रचार करण्याचा मला ‘ वरून ‘ आदेश , बागेश्वरबाबा म्हणाले की.. 

Spread the love

धीरेंद्र कृष्णशास्त्री महाराज अर्थात बागेश्वर बाबा सध्या चांगलेच चर्चेत असून दिव्य दरबारात बाबांनी बोलताना एक अजब विधान केलेले असून त्यांच्या या विधानाची सोशल मीडियात  जोरदार चर्चा सुरू आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी , ‘ मी सनातन धर्माचा प्रचार करतो. असा प्रचार करावा असा मला वरून आदेश देण्यात आलेला आहे , ‘ असे म्हटले आहे. 

बागेश्वर बाबा यांनी एक मुलाखत दिली त्यामध्ये बोलताना ते म्हणाले की , ‘ लोक प्लॅनिंग करून माझी परीक्षा घेत असतात मात्र हनुमानजींच्या कृपेने आपण प्रत्येक गोष्टींमध्ये यशस्वी होतो . अशिक्षित लोक मला पुरावे द्यायला सांगतात. माझे शिक्षण अध्यात्म आणि हनुमानजींच्या कृपेमुळे झालेले आहे. ज्यांना शंका आणि प्रश्न आहे त्यांनी माझ्याकडे येऊन अनुभव घ्यावा. 

मी जे काही सांगतो ते सांगण्याचा आदेश मला हनुमानजी करतात. त्यांची आज्ञा मोडणे आणि त्यांना चुकीचे ठरवणे माझ्या अधिकारात नाही. जे काही मी करतो ते सर्व गुरूंच्या कृपेने शक्य होते त्यांच्याकडून मी हे सर्व साध्य केलेले आहे त्या शक्तीचे नाव आहे शक्तीपीठ . पूर्वी आमचे आजोबा देखील असेच करायचे मात्र त्यावेळी त्यांचे क्षेत्र मर्यादित होते. गुरूंच्या कृपेने मला सनातन धर्माचा प्रचार करण्याची आज्ञा मिळालेली आहे. आपण सर्व लोककल्याणासाठी करतो मात्र लोक याकडे आपापल्या दृष्टिकोनातून पाहतात. 

गुरुजींनी सांगितलेली हनुमानाची पूजा मी करतो. मी कोणतीही तपश्चर्या करत नाही. दोन्ही पद्धती गुप्त आहेत हा विषय कोणत्याही माणसावर सांगण्याचा माझा प्रयत्न नाही मी फक्त हनुमानजींच्या त्या विधीचे पालन करतो . मला एक अनुभूती मिळते आणि त्या क्षणी समोरच्या व्यक्तीला जे काही प्रश्न असतील ते आम्ही लोकांना सांगतो त्यानंतर गुरुदेव आणि हनुमान जी काय ते पाहून घेतात ‘, असे देखील ते पुढे म्हणाले. 


Spread the love