चिंताजनक! मुंबईच्या रुग्णसंख्येनं 20 हजारचा टप्पा ओलांडला

मुंबई : मुंबई आज तब्बल 20 हजारपेक्षा नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात वीस हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून कोणहीती लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड मोठी असल्याचं समोर आलं आहे. तब्बल 17154 रुग्ण असे आढळून आले आहेत, ज्यांना कोणतीही लक्षणं नाही. अशा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, आज रुग्णालयात एकूण 1 हजार 170 रुग्णांचा दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिवसभरात एकूण 2 हजार 837 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर तब्बल 67487 इतक्या चाचण्या मुंबईत करण्यात आल्या आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊन अटळ असल्याचंच अधोरेखित होताना पाहायला मिळतंय. आज झालेल्या रुग्णवाढीनंतर आता महापौर किशोर पेडणेकर यांच्या आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री मुंबईबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Share