पुणे हादरलं..बिबट्याने नेलं समजून तपास सुरु असतानाच .. 

Spread the love

एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे समोर आलेली असून 18 वर्षे एका तरुणीने विहिरीत उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केलेला आहे.. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अर्चना लक्ष्मण करगळ ( वय 18 वर्षे मूळ राहणार गाजीपुर ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा नगर ) असे मयत तरुणीचे नाव असून तिचे वडील मेंढपाळ असून ते वडगाव कांदळी येथे स्थायिक झालेले आहेत. 

अर्चना ही संध्याकाळी सातच्या सुमारास बेपत्ता झालेली होती. आपल्या मुलीला बिबट्याने नेलेले आहे असा तिच्या वडिलांचा समज झाला आणि त्यांनी वनविभागात या प्रकरणी खबर दिली. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून देखील तिचा तपास सुरू होता मात्र ती आढळून आली नाही. अर्चनाची चप्पल आणि ओढणी एका विहिरीजवळ आढळून आली आणि त्यानंतर विहिरीत तिचा मृतदेह आढळला.


Spread the love