‘ अहो उठा जेवण करून घ्या ‘ , पत्नी हाका मारत होती मात्र दरवाजा उघडला तर ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना अमरावती येथे उघडकीस आली असून पत्नीला स्वयंपाक बनवण्याचे सांगून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मासोद येथील एका शेतातील झोपडीत ही घटना घडली असून अरविंद सुखाराम बेठेकर ( वय 36 ) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, बेठेकर दाम्पत्य हे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शिवारातील बसेरिया यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करत होते आणि तेथील झोपडीत दोघेही पती-पत्नी राहत होते. 13 जानेवारी रोजी संध्याकाळी अरविंद हा दारू पिऊन घरी आला आणि बायकोला स्वयंपाक बनवायला सांगितले. बायको शेतातील घराच्या बाहेर स्वयंपाक बनवत असताना अरविंद हा घरात होता त्याने कडी लावली आणि पंख्याला शाळा बांधून गळफास घेतला.

दुसरीकडे बायको ‘ स्वयंपाक झाला जेवण करून घ्या ‘ असे म्हणत हाका मारत होती मात्र आतून कडी लावली असल्याने तिला शंका आली आणि त्यामुळे तिने काहीजणांना बोलावून घरात प्रवेश केला असता आतील दृश्य पाहून तिने हंबरडा फोडला. जेवण बनवण्यास सांगून पतीने गळफास घेतल्यामुळे काय बोलावे हेच तिला समजत नव्हते त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला दवाखान्यात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.


Spread the love