प्राण्यांचा आवाज असेल म्हणून ग्रामस्थांनी देखील फिरवली पाठ मात्र होता ‘ वेगळाच ‘ प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील पांगरी इथे उघडकीस आली आहे. पांगरी येथील हनुमान स्टॉपजवळील ४ दगडांच्या मधोमध १ वर्षाच स्त्री जातीचं एक बालक सापडलं असून तब्बल ४ दिवस हे बालक ठिकाणी रडत होत मात्र परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात आला नाही. प्राण्यांचा आवाज असेल म्हणून येथील ग्रामस्थांनी दुर्लक्ष केलं मात्र अखेर ग्रामस्थांनी या आवाजाचा शोध घेण्याचे ठरवले आणि हा प्रकार उघडकीस आला.

सरपंच सुनील म्हादये ग्रामपंचायतीत गेले असता त्यांना सदर बातमी समजताच त्यांनी पोलीस पाटील व ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी धाव घेतली. या ठिकाणी जाऊन पाहिले तर एक स्त्री जातीचे बालक विव्हळत पडलेले होते. ४ दिवस अन्न-पाण्यावाचून तडफडत असणाऱ्या या बालकाचे अंग थंडीने गार पडले होते तर बालकाच्या तोंडून आवाजही फुटत नव्हता . रडून रडून या बाळाचा घसा बसलेला होता.

सरपंच, ग्रामसेवक अखिलेश गमरे, पोलीस पाटील श्वेता कांबळे, ग्रामस्थ तसेच वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे मंगेश राऊत, सिएचचो सोनाली चव्हाण, आशा वर्कर दीक्षा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बालकाला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दिनेश मुळ्ये, गावप्रमुख प्रभाकर तेगडे, दत्ताराम जाधव, प्रदीप म्हादये, शिवराम दुडये आणि ग्रामस्थ यांनी सरकारी यंत्रणेची वाट न पाहता प्राथमिक उपचार सुरू केले आहेत तर पोलिसही हे बाळ इथे कोणी आणले याचा तपास करत असल्याचे समजते .


Spread the love