महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून नवी मुंबईतील नेरूळ इथे चक्क जन्मदात्यांनीच आपल्या 3 मुलांची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 लाख 90 हजाराला ही मुले विकल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांनी या मुलांच्या आईला अटक केली असून मुलींचा बाप मात्र कारवाईची खबर लागताच फरार झाला आहे. ठाणे महिला व बालविकास विभागाने ही घटना उघडकीस आणली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , संबधित कुटुंब हे नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात आरोपी राहत असून सदर दाम्पत्य हे आपल्या बाळांना जन्म देऊन ते विकत असल्याची माहिती महिला बालविकास विभागाला डिसेंबर महिन्यात मिळाली होती. गरोदर असलेली आरोपी आई शारदा शेख हिच्यावर विभागाने पाळत ठेवली होती. डिसेंबर महिन्यात बाळाला जन्म दिल्यानंतर शारदा शेख हिच्या जवळ सुरुवातीचे 15 दिवस बाळ होते मात्र काही काळातच बाळ गायब झाले.
बाळ गायब झाल्याचे समजताच प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आणि आई शारदा शेख हिला ताब्यात घेण्यात आले असताना तिने हे बाळ विकल्याची कबूली दिली. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणी बाळ विक्री करणारी आई शारदा शेख आणि सहआरोपी आसीफअली फारूखी या दोघांना अटक केली असून आत्तापर्यंत आरोपी आईवडील आयूब खालीब आणि शारदा शेख या दोघांनी दोन अपत्ये 2 लाख 90 हजारांना विकल्याचे कबूल केले आहे तर तिसऱ्या अपत्याचे मात्र अद्याप पैसे मिळाले नाहीत असे आरोपींचे म्हणणे आहे .
दत्तक कायदा डावलून नियमबाह्य बाळांची विक्री केल्याप्रकरणी आईला अटक केली असली तरी मुलांचा बाप मात्र फरार झाला आहे. यामध्ये बाळ विकत घेणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल केला असून त्यांनी विकत घेतलेल्या दोन मुली पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पहिली मुलगी 90 हजार दुसरी मुलगी 2 लाखाला विकली होती. तिसऱ्या मुलाचा शोध सध्या नवी मुंबई पोलीस घेत आहेत.