लातूरमध्ये भरदिवसा खून प्रकरणातील आरोपी ताब्यात, आता म्हणतोय की..?

Spread the love

लातूर शहरात दोन दिवसांपूर्वी कॉलेजचा विद्यार्थी रोहन उजलंबे याचा भर दिवसा खून झाल्याने खळबळ उडाली होती मात्र आता पोलिसांनी या प्रकार खुनी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून तो चक्क अल्पवयीन असल्याची बाब समोर आलेली आहे . विशेष म्हणजे डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणारा हा अल्पवयीन आरोपी ‘मुळशी पॅटर्न’ आणि खुनी चुलत भावाच्या प्रभावाखाली येऊन खुनी बनला असे देखील उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी म्हटले आहे .

लातूरमध्ये दोन दिवसांपूर्वी भरदुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विशाल नगर मधील साई मंदिराच्या समोर रोहन उजळंबे याचा कोयत्याने वार करून खून करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. आरोपी अल्पवयीन असून तो दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत होता. आरोपीला दहावीला 94 टक्के गुण मिळाले होते. आरोपीला डॉक्टर व्हायचे होते त्यासाठी विधवा आईने शेती विकून पैशाची तजवीज केली होती मात्र त्याच्यावर चित्रपटाचा प्रभाव पडला आणि त्यामुळे त्याने हे कृत्य केले.

काही दिवसांपूर्वी मयत रोहन उजळंबे आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला आणि रोहनने आरोपीला सार्वजनिक ठिकाणी चापट मारली होती त्याचा राग मनात वाढत गेल्याने आरोपीने रोहन उजळंबेचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली असून ‘मुळशी पॅटर्न आणि खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेला आपल्या चुलत भावाचा देखील आपल्यावर प्रभाव निर्माण झाला होता म्हणून आपल्याकडून हा प्रकार झाला असे आरोपीने कबुल केले आहे .

मी तुला पाच हजार रुपये देतो आणि आपल्यात झालेला वाद मिटवून घेऊ असे सांगून आरोपीने रोहनला बोलावून घेतले आणि विशाल नगरमधील साई मंदिराच्या समोर आल्यावर रोहन आपल्या मोबाईल मध्ये पाहत असताना आरोपीने आपल्या शर्टमध्ये मागील बाजूस लपवून आणलेल्या कोयत्याने रोहनच्या डोक्यात सपासप वार केले तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच तेथून आरोपीने पळ काढला होता मात्र पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे .


Spread the love