महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आली होती मात्र पोलिसांनी विक्रमी वेळेत आरोपीस गजाआड केले असून सदर युवकाचा खून हा विवाहबाह्य संबंधामुळे झाला असल्याचे समोर आले आहे .हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी बहिनाराव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सचिन धुळबा धवसे ( वय ३० ) हे मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणक चालक म्हणून कार्यरत होते. २३ जानेवारी रोजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात रात्री सचिनचा डोक्यात दगड मारून खून केल्याचे शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आले आणि पोलिसांना या प्रकाराची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करून या खून तपासाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी गावात विचारणा केली असता गावातील एका महिलेसोबत सचिन याचे अनैतिक संबंध होते. वारंवार सांगूनही सचिन ऐकत नसल्याने खून करण्यास सहकार्य करणाऱ्या पंडित पोले यांनी ही माहिती दिली तसेच सचिनचा खून करून ते दोघे परभणी मार्गे पळून गेले असल्याचे देखील पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून या खुनातील मुख्य आरोपी विश्वनाथ धवसे यास छोट्या मुलासोबत ताब्यात घेतले आहे.