किन्नर उषा राणी मर्डर केसचे गूढ उलगडले, आरोपीकडून अनेक धक्कादायक खुलासे

Spread the love

देशात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. एका किन्नराच्या संशयास्पद मृत्यूचा तपास हे पोलिसांपुढे मोठे आव्हान बनून राहिले होते मात्र अखेर बिहारची राजधानी पटणामध्ये झालेल्या या प्रकाराची पोलखोल करण्यात बिहार पोलिसांना यश आले आहे . खून झालेल्या किन्नर व्यक्तीचे नाव उषारानी असून तिचा खून हा तिचा प्रियकर असलेल्या नवीन कुमार यानेच केल्याचे उघड झाल्यावर पोलिसही चकित झाले आहेत.

गेल्यावर्षी २० डिसेंबरला पटणा इथे आलमगंज एरियामध्ये किन्नर उषा राणीच्या संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पोलीस या केसची चौकशी करत होते मात्र बरेच दिवस होऊन गेले तरी हाती काही माहिती येत नसल्याने पोलिसांपुढे या तपासाचे आव्हान उभे राहिलेले होते मात्र अखेर आरोपीस जेरबंद करण्यात आले असून किन्नर समाजाने देखील पोलिसांचे आभार मानले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , किन्नर उषा राणीचे नवीन कुमार उर्फ आशुतोषसोबत अनैतिक संबंध होते. किन्नर उषा राणी नवीन कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती. दोघेही सोबत राहत असल्याने नवीन कुमारने २० डिसेंबरच्या दिवशी उषा राणीसोबत शारीरिक संबंध ठेवला आणि त्यानंतर उषा राणीला ड्रग्सचा ओव्हरडोज दिला आणि त्यानंतर त्याने उषाचे दागिने आणि पैसे घेतले आणि तो फरार झाला.

पोलिसांनी आरोपी नवीन कुमारला विस्कोमान कॉलनीतून अटक केली असून तो सुरुवातीपासूनच गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्याकडून एक पिस्तुल, दोन काडतूस आणि दोन मॅगझिन ताब्यात घेण्यात आले असणं त्याच्याकडे ८२ ग्रॅम स्मॅक ड्रग्सही आढळून आलं आहे . गुन्हा कबूल केल्यानंतर आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले असून आरोपीने अनेक किन्नरांसोबत संबंध ठेवले असल्याची देखील कबुली दिली आहे .

नवीन कुमार याने हे कबूल केलं आहे की किन्नर उषा राणीकडे भरपूर पैसा होता ज्यामुळे त्याने उषा राणीला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि नंतर उषा राणीचे दागिने आणि पैसे लुटण्यासाठी हळूहळू तिचा विश्वास संपादन केला. संधी बघून त्याने तिची हत्या केली.


Spread the love