भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, पलकच्या सगळ्या कारनाम्याची न्यायालयात झाली पोलखोल

Spread the love

इंदूर येथील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू उदयसिंह देशमुख उर्फ भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूरच्या सत्र न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून त्यांचे शिष्य असलेली पलक पुराणिक, चालक शरद देशमुख , मुख्य सेवादार विनायक दुधाळे यांना दोषी ठरवत सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

भय्यू महाराज यांनी इंदूर येथील निवासस्थानी 12 जून 2018 रोजी रिवॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. तपास सुरू असताना महाराज यांना काही व्यक्ती ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांना कुणकुण लागली आणि सात महिन्यांनी पलक पुराणिक हिला ताब्यात घेण्यात आले. तिने भय्यू महाराज यांना ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळण्याचा तिच्यावर आरोप होता तसेच तिला मदत केल्याच्या आरोपावरून विनायक आणि शरद यांना देखील अटक करण्यात आली.

फॉरेन्सिक लॅबने पलक हिच्या मोबाईल मधील डाटा रिकवर केला त्यात ती भय्यू महाराज यांना लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल करत असल्याचे देखील समोर आले. भय्यू महाराज हे नैराश्यात असल्याने त्यांना औषधे सुरू होती मात्र त्यांना गरजेपेक्षा तीन पट अधिक डोस देऊन हे त्रिकुट त्यांना कायम नशेत ठेवत होते. याच दरम्यान पलक पुराणिक हिने महाराज नशेत असल्याचा फायदा उचलत त्यांच्यासोबत काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवले आणि त्यातून तिने महाराज यांना लुबाडण्यास सुरु केले होते.

भय्यू महाराज यांच्या डायरीमध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली होती त्यात त्यांनी प्रचंड तणावामुळे आत्महत्या करत आहे असे म्हटले होते. भय्यू महाराज यांनी या घटनेच्या आधी एक महिना देखील एक महिन्यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पलक हिच्याकडे भय्यू महाराज यांच्या तिजोरीच्या देखील आल्या होत्या तर महाराज यांची दुसरी पत्नी यांनादेखील महाराजांना भेटून दिले जात नव्हते. अत्यंत प्लॅनिंग करून भय्यूजी महाराज यांना या त्रिकुटाने अक्षरशः लुटले त्यातून नैराश्य येऊन महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती .


Spread the love