‘ वो बुलाती है मगर ‘, दोन हजारांचे काही मिनिटात दोन लाख , महिला फरार

Spread the love

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात समोर आली असून एका व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला हनी ट्रॅपचा बकरा बनवण्यात आले आहे.सदर प्रकरणात आरोपी महिलेने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून दोन लाख रुपयांची वसुली देखील केली आहे . पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली तर मुख्य आरोपी महिला अद्याप फरार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मुरारीलाल ( वय ५५ ) हे १५ जानेवारी रोजी शहरातील घंटाघर रोडने आपल्या घरी जात असताना वाटेत एका महिलेने थांबून ओळख सांगून दोन हजार रुपयांची मदत मागितली. व्यापारी मुरारीलालने यांनी मदत करण्याच्या भावनेने या महिलेला पैसे दिले आणि त्यानंतर दोघांनीही आपापले मोबाईल नंबर एकमेकांना दिले.

आरोपी महिलेने पैसे करत करण्याच्या मुरारीलाल यांना ती राहत असलेल्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीत घरी बोलावले आणि अचानक कपडे काढले आणि याचदरम्यान घरमालक सीताराम घरात घुसले आणि त्यांनी महिला आणि व्यावसायिकाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. घरमालक सीताराम याने व्यावसायिकाकडे चार लाख रुपयांची मागणी केली आणि ते न दिल्यास व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

आपल्यासोबत झालेला हा प्रकार पाहून मुरारीलाल यांनी या महिलेला दोन लाख रुपये देण्याचे कबूल केले आणि नंतर ते दिले देखील मात्र तरीही पैसे दिल्यानंतरही आरोपी व्यावसायिकावर दबाव टाकत होता. पीडित व्यावसायिक यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांना ब्लॅकमेल करणाऱ्या सीतारामला ताब्यात घेण्यात आले तर मुख्य आरोपी महिला फरार आहे .


Spread the love