महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात उघडकीस आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली झालेल्या ब्राह्मणी गावातील ‘ तसल्या ‘ डान्सने राज्यात चांगलीच खळबळ उडवली असून आता तर या प्रकरणात राजकारण्यांचा देखील सहभाग आढळून आला असून ब्राह्मणी गावातील उपसरपंच रितेश आंबोणे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सूत्रांच्या माध्यमातून या सर्व प्रकारचा फायनान्सरच रितेश आंबोणे हा व्यक्ती असल्याचे समोर येत आहे तसेच घटना घडली त्या दिवशी आलेल्या ‘ पाहुण्याच्या (?) हातावर शिक्के मारण्याचे काम देखील याने स्वत: उभे राहून केल्याचे समोर आले आहे. एसआयटीच्या प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे .
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली चालला ‘ अॅलेक्स जुली के हंगामे’ या नावाने ग्रामीण भागात पार पडलेल्या डान्स शो मध्ये जितके जास्त शरीर दाखवले जाईल त्या पद्धतीने दर आकारणी होत होती .पहिला भाग ‘हंगामा शो’ म्हणून ओळखला जायचा ज्यात आंबटशौकीन लोकांसाठी विशेष काही नसायचे तर दुसरा भाग ‘नो एन्ट्री’ असून त्यात अर्धनग्न अश्लील नृत्य सादर केले जायचे तर रात्री उशिरा सुरू होणारा तिसरा भाग ‘हॉट एन्ट्री’ असायचा अन यात चक्क नग्न नृत्य सादर करत अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जायच्या. सर्वाधिक दर हे रात्रीत होणाऱ्या शोचे असायचे.
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांना आरोपी बनवत त्यापैकी 13 जणांना अटक केली आहे त्यामध्ये ब्राह्मणी गावाचा उपसरपंच रितेश आंबोणे याचाही समावेश आहे. स्वतः पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यानंतर महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटीची निर्मिती करत पोलिसांनी या न्यूड डान्सचे गावातील आयोजक, संबंधित ऑर्केस्ट्राचा संचालक, त्याचे काही नर्तक आणि आयोजनामध्ये सहकार्य करणारे गावातील काही लोक असे एकूण 13 जणांना अटक केली आहे.