महाराष्ट्र हादरला..’ गरज असेल तेव्हा..’, तब्बल इतक्या जणांकडून घृणास्पद प्रकार

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात पेन तालुक्यातील वाशी येथे उघडकीस आली असून सतरा वर्षे युवतीला धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सदर प्रकरणात सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगी ही दहावीपर्यंत शिकलेली असून वाशी गावाच्या परिसरात एका हळदी समारंभासाठी गेली होती. तिथे गेल्यानंतर तिची दोन तरुणांसोबत ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यातून या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. पीडित मुलगी ही शांत राहत असल्याचे पाहून या तरुणांच्या इतर मित्रांनी देखील तिचा गैरफायदा घेत तिला धमकावत तिच्यावर अत्याचार सुरू केले.

गरज असेल तेव्हा या मुलीला बोलावून घेत हे नराधम तिचे लैंगिक शोषण करत होते. दररोज आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करण्यात येत होते. मागील अनेक महिन्यांपासून तिच्यासोबत हा प्रकार सुरू होता तर आत्तापर्यंत 15 पेक्षा जास्त जण या प्रकरणात आरोपी असल्याची चर्चा सुरू आहे..वडखळ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी असलेल्या पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या सात आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


Spread the love