‘ मला कोण नाही पळवलं मीच पळून गेलीय ‘ , सोशल मीडियात व्हायरल झाला व्हिडीओ

Spread the love

गेल्या काही वर्षांपासून समाज माध्यमांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर प्रेमीयुगुल घरातून पळून जाऊन लग्न करतात मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना समाजात मोठ्या बदनामीला सामोरे जावे लागते आणि त्यातून ऑनर किलिंग यासारखे प्रकार देखील काढतात मात्र आता पळून गेलेले प्रेमीयुगुल चक्क सोशल मीडियावर आपल्या जीविताला धोका असल्याचे व्हिडिओ टाकत आहेत तर यामुळे कुटुंबीयांची चांगलीच गोची होत आहे .

असाच एक प्रकार बिहार येथे उघडकीस आला असून एक मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आणि तिच्या वडिलांनी मुलीला पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली मात्र त्याच मुलीने तिच्या सोशल मीडिया पेजवर माझे लग्न झाले आहे असे स्टेटस पोस्ट केले आणि त्याचा व्हिडिओ देखील शेअर केला सोबतच ‘ बाबा आम्हाला त्रास देऊ नका ‘ असे देखील तिने म्हटले आहे.

वडिलांनी केलेली अपहरणाची तक्रार तिने फेटाळून लावली असून मी माझ्या मर्जीने लग्न केले आहे असे म्हणत तिने पोलिसांना देखील मदतीचे आवाहन केले आहे . वायरल व्हिडिओ बद्दल तपास केल्यानंतर मुलगी मलिकपुर येथील असून ही मुलगी एका मुलासोबत लग्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्यावर कुठलाही दबाव नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.


Spread the love