बीड इथे धरलेल्या लेकुरवाळ्या आंटीला पोलिसांनी कसं वागवलं ?

Spread the love

कधीकधी आईवडिलांकडून गुन्हा झाल्यानंतर मुलांना त्याची शिक्षा दुर्दैवाने भोगावी लागते अशीच एक घटना बीड येथे उघडकीस आली असून शिवाजीनगर पोलिसांनी एका कुंटणखान्यावर टाकलेल्या छाप्यामुळे 3 फेब्रुवारी रोजी पकडलेल्या लेकुरवाळ्या आंतीला अटक करण्यात आली होती. तिच्यासोबत अकरा महिन्याचे बाळ देखील होते त्यामुळे दुर्दैवाने या बाळाला देखील तिच्या आईसोबत पोलीस ठाण्यात रात्र काढावी लागली. काहीही चूक नसताना पोलीस ठाण्यात राहण्याची दुर्दैवी वेळ या बाळावर आली.

बीड शहरानजीक शहरातील जालना रोड परिसरातील गया नगर येथे एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्याचा शिवाजीनगर पोलिसांनी 3 फेब्रुवारी रोजी पर्दाफाश केला होता त्यावेळी 30 ते 35 वयोगटातील दोन पीडित महिला देखील तिथे आढळून आल्या. या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याच्या आरोपाखाली पंचवीस वर्षीय आंटीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सदर फ्लॅटमध्ये तिने गेल्या काही दिवसांपासून निव्वळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने कुंटणखाना सुरू केला असल्याची माहिती देखील समोर आली होती.

छापा टाकला त्यावेळी आढळलेल्या दोन पीडित महिलांना तीन तारखेला सुधारगृहात पाठविण्यात आले होते मात्र आंटीला या प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आंटी ही लेकुरवाळी असल्याने तिला अकरा महिन्यांची एक मुलगी देखील आहे. पोलिसांच्या कारवाईने माय लेकराची ताटातूट झाली मात्र मुलगी आईपासून दूर राहू शकत नसल्याने तिला सोबत ठेवण्याची देखील परवानगी देण्यात आली होती. पोलिसांनी तिच्या बाळासह एका खोलीत रात्रभर महिला अंमलदाराच्या निगराणीखाली ठेवले होते.

पोलीस शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना, ‘ बाळ खूपच लहान होते. आईच्या अटकेनंतर ते दूर राहू शकत नव्हते त्यामुळे नातेवाईक बाळाला घेऊन ठाण्यात आले तेव्हा त्याला सोबत राहू देण्याची संमती दिली होती. या बाळाला व त्याच्या आईला जेवण दिले. थंडीचे दिवस असल्याने उबदार कपडे देखील दिले. कायद्याच्या चौकटीत राहून बाळाची काळजी घेण्यात आली, ‘ असे सांगण्यात आले आहे.


Spread the love