मुंबईत खळबळ.. अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीला घरात बोलावले अन

Spread the love

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना मुंबई येथे समोर आली असून दोन महिन्यांपूर्वी घरी बोलावून अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्यानंतर विवस्त्र अवस्थेत तिचा व्हिडीओ शूट करून तिला ब्लॅकमेल करायचा प्रकार मुंबईत समोर आलेला आहे. बांगुरनगर पोलिसांनी एकवीस आणि तेवीस अशा दोन व्यक्तींवर वर्षांच्या व्यक्तींवर पॉक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगी ही भगतसिंग नगर येथे राहते. दोन महिन्यांपूर्वी ती शाळेतून परतत असताना परत येत असताना आरोपी यांनी तिला आपल्या घरात बोलावले. आरोपी हे पीडित मुलीच्या ओळखीतले असून त्यांच्यावर विश्वास ठेवून ती त्यांच्या घरात गेली आणि त्यानंतर तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.

दोन्ही आरोपींनी तिला जबरदस्तीने विवस्त्र करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यांच्या मोबाईल मध्ये या नराधमांनी तिचा व्हिडिओदेखील शूट केला. कुणाला काही सांगशील तर तुझा व्हिडिओ तुझ्या मित्रांना आणि पालकांना शेअर करेन अशी धमकी देखील त्यांनी दिली त्यामुळे पीडित मुलगी गप्प राहिली याचा फायदा घेत या नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले मात्र त्यांचा त्रास सहन होत नसल्याने पीडित मुलीने अखेर पोलिसात धाव घेतली.


Spread the love