अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून संगमनेर तालुका पोलिस हद्दीत परराज्यातील एका पंक्चर चालकाचा शुक्रवारी चार तारखेला खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अब्दुल मोहम्मद युनुस कादिर ( वय 27 जिल्हा वैशाली बिहार ) असे त्याचे नाव असून संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील एका पंक्चर दुकानात ही घटना उघडकीस आली आहे.
चंदनापुरी गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव भिमाजी राहणे यांना एक फोन आला त्यामध्ये चंनापुरी शिवारातील एका पंचर दुकानात एक दुकानदार पडलेला असून तो काही बोलत नाही असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्यानंतर पोलीस पाटील तिथे पोहोचले असता, अब्दुल तिथे पडलेला होता. त्याच्या अंगावर कमरेपर्यंत रग पांघरलेला होता मात्र तो काहीही हालचाल करत नव्हता आणि त्याच्या जवळ पंचर दुकानात एक लोखंडी रॉड पाडलेला होता त्याला रक्त देखील लागलेले होते तसेच जमिनीवर एक लाकडी मूठ असलेली सुरी देखील आढळून आले आणि तिला देखील रक्त लागलेले होते .
त्याच्या डोक्याला जखम झाली होती तर पाठीवर ठिकठिकाणी जखमा देखील आढळून आल्या. अंथरूणावर रक्त सांडले होते तर दुकानाच्या पत्रावर देखील काही ठिकाणी रक्त आढळले. अज्ञात व्यक्तीने कादिर यांचा खून केला असे पोलीस पाटील राणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्याच्या आधारावर तपास सुरू आहे.