नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंक्चर काढणाऱ्या एका व्यक्तीचा त्याच्या दुकानात मृतदेह आढळून आला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला जेरबंद केले असून काही वर्षांपूर्वी झालेल्या मैत्रीनंतर मयत व्यक्ती आणि आरोपी यांनी बेकरी व्यवसाय सुरू केला होता मात्र त्यातील आर्थिक तोट्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि उत्तर प्रदेशमधील आरोपीने बिहार येथे युवकाचा खून केल्याचे समोर आले आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी शिवारात ही घटना घडली होती. पोलिसांनी विक्रमी वेळेत तपास करून आरोपीला गजाआड केले आहे
अब्दुल मोहम्मद युनुस कादिर ( वय 27 जिल्हा वैशाली राज्य बिहार ) असे मयत व्यक्तीचे नाव असून नौशाद अंसारी ( वय 38 मूळ राहणार उत्तर प्रदेश हल्ली राहणार रहमत नगर संगमनेर ) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. बेकरी व्यवसायात झालेल्या तोट्यानंतर त्यांच्यात भांडणे निर्माण झाली होती त्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
आरोपी आणि मयत व्यक्ती यांनी एकत्र येत संगमनेर येथे बेकरी व्यवसाय सुरू केला होता. त्यात बिहार येथे राहणाऱ्या कादिर यांनी अधिक भांडवल गुंतवले होते मात्र व्यवसायात तोटा होत असल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाले. अन्सारी हा पैसे देत नसल्याने त्यांच्यात वाद होत होते. सदर प्रकरणी त्यांनी नोटरी देखील केली होती मात्र तरी देखील वाद निर्माण होत असल्याने कादर याने चंदनापुरी शिवारात टायर पंचर काढण्याचे दुकान सुरू केले होते.
शुक्रवारी चार तारखेला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कादिर यांचा मृतदेह त्याच्या दुकानात आढळून आला होता. पोलीस पाटील यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तपासाला गती आली आणि पोलिसांनी विक्रमी वेळेत तपास करत आरोपीला गजाआड केले आहे. सदर प्रकरणी या खुनात इतरही काही कारणे आहेत का ? याचा देखील पोलीस तपास घेत आहेत.